जळगाव : दसऱ्याला सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोने २०० रुपयांनी स्वस्त होत ६१, ४०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३,५०० रुपये प्रतिकिलोवर आली. यामुळे विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी साधली जाणार आहे.
काय आहे भाव
सोने ६१,४०० रुपये (प्रति १० ग्रॅम)
चांदी ७३,५०० रुपये (प्रतिकिलो)
६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील युद्धसंकटामुळे जगभरातील बाजार कोसळले असून, त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला. भारतीय शेअर बाजार सोमवारी ८२५ अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.















Discussion about this post