जळगाव । सोन्यासह चांदी दरात सुरु असलेली चढ उतार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही कायम होती. आज जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, मंगळवारी सोने आणि चांदीच्या दराने अचानक उसळी घेतल्याचे दिसून आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.
काय आहे सोन्याचा दर?
जळगाव शहरात सोमवारी ५१५ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह एक लाख २७ हजार २०५ रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर प्रति १० ग्रॅम १८५४, तर १० तोळ्यासाठी १८ हजार ५४० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २९ हजार ०५९ रूपयांपर्यंत वधारले. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते तर २२ कॅरेट सोने अंदाजे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
चांदीत ५१५० रूपयांनी वाढ
सोमवारी दिवसभरात १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत खाली आली होती. मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६४ हजार ८०० रूपयांपर्यंत वधारली.















Discussion about this post