Saturday, November 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो लक्ष द्या! सिंचनाच्या पाण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
उन्हाळी हंगामी पिकासाठी 15 एप्रिल पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव |  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावरील जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा, पांझण डावा कालवा, निम्न गिरणा कालवा तसेच बोरी व अंजनी मध्यम प्रकल्पांवरून रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये उपलब्ध पाणीसाठ्यानुसार मर्यादित सिंचन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उपलब्ध पाणीसाठ्यानुसार दि. १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत उभी पिके तसेच हरभरा, ज्वारी, दादर, हायब्रीड कडबळ आदी हंगामी पिकांसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.

सिंचनासाठी इच्छुक लाभधारकांनी नमुना क्रमांक ७, ७-अ व ७-ब मधील पाणी मागणी अर्ज आवश्यक अटींची पूर्तता करून दि. २२ डिसेंबर २०२६ पर्यंत संबंधित पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावेत. अर्जासोबत ७/१२ उतारा अथवा खाते पुस्तिका दाखविणे आवश्यक आहे.

पाणी मागणी अर्ज मंजूर होण्यासाठी उन्हाळी हंगाम २०२५-२६ पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरलेली असावी. चारीच्या मुखाजवळील सलग क्षेत्रासच मंजुरी देण्यात येईल. चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. शेतचाऱ्या स्वच्छ व गवतविरहित ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजू नये. अर्जाचा निर्णय संबंधित पाटशाखा किंवा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घेता येईल.

पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत २२ डिसेंबर २०२६ नंतर वाढविण्यात येणार नाही. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अथवा अपरिहार्य कारणास्तव मंजूर पिकास पाणीपुरवठा करता न आल्यास होणाऱ्या पीक नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. शासनाच्या प्रचलित निर्णयांनुसार व वेळोवेळी सुधारित दरांप्रमाणे पाणी आकारणी भरणे बंधनकारक राहील.

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून जास्तीत जास्त लाभधारकांनी पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. प्र. पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अजितदादा गेल्यावर विलिनीकरण संपलं!’ सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात चर्चेला लावला पूर्णविराम

Next Post

जळगावकरांनो घाबरू नका, सतर्क राहा! भूकंपानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे महत्त्वाचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगावकरांनो घाबरू नका, सतर्क राहा! भूकंपानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे महत्त्वाचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगावात जनजातीय गौरव दिवस

November 14, 2026
इंडिया एक्झिम बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती 

बँकेत नोकरीची मोठी संधी! एक्झिम बँकेत १२० पदांसाठी भरती

November 14, 2026
मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिला खासदारकीचा राजीनामा; काय आहे कारण?

मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिला खासदारकीचा राजीनामा; काय आहे कारण?

November 14, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

मनोज जरांगेंचा पुन्हा ‘ऑडिओ बॉम्ब’! फडणवीस-शिंदेंना धक्का देणारी क्लिप लवकरच बाहेर काढणार?

November 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page