जळगाव शहरासह जिल्ह्यात दोन दिवसाच्या ब्रेक नंतर पावसाने हजेरी लावली आहे. सध्या अधूनमधून पाऊस हजेरी लावत असून मुसळधार पाऊस कधी कोसळणार याची प्रतीक्षा जळगावकरांना लागली आहे. अशातच हवामान खात्याने ६,७ जुलै पासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे
आज गुरुवारी दुपारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील खरिपाच्या पेरण्या देखील करून घेतल्या असून, आतापर्यंत जिल्ह्यात ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जून महिन्यात दमदार बरसल्यानंतर पावसाचा वेग गेल्या दोन दिवसांपासून थोडा मंदावला होता. अजून दोन दिवसांच्या ब्रेकनंतर जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, ६ ते ७ जुलैपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.सध्या पाऊस पडत असला तरी जिल्ह्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे. तर अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जून महिन्यात दमदार बरसल्यानंतर पावसाचा वेग गेल्या दोन दिवसांपासून थोडा मंदावला होता.















Discussion about this post