जळगाव। येत्या दोन तीन महिन्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुका लागणार आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठा फेरबदल झाला आहे. जळगाव जिल्हा पोलिस दलातून ३० पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत. तसेच २४ पोलिस अधिकारी जळगाव जिल्ह्यात बदलून येत आहेत.
जळगाव जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे तर अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातून दोन पोलिस निरीक्षक बदलून जाणार असून नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड जळगावला येत आहेत. विनंती बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात तीन नवीन सहाय्यक पोलिस निरीक्षक येत आहेत. दोन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्यातून इतरत्र बदली करण्यात आली असून पाच नवीन उपनिरीक्षक येत आहेत. जळगाव जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. नवीन ७ सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात पोलिस उपनिरीक्षकांची बदली झाली असून तेवढेच अधिकारी जिल्ह्यात येत आहेत.
जळगावला येणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) – गणेश शिवाजी म्हस्के (नाशिक), योगिता मधुकर नारखेडे (नाशिक ग्रामीण), अमितकुमार प्रतापसिंग बागूल (नंदुरबार), अनिल लोटन वाघ आणि जयेश पिराजी पाटील (नाशिक), रवींद्र नारायण पिंगळे, प्रमोद वाघ आणि नितीन नारायण रणदिवे, (अहमदनगर).
जळगाव येथून बदलून जाणारे सहायक पोलिस निरीक्षक – संदीप अशोक हजारे – अहमदनगर, शीतलकुमार नाईक मुदतवाढ, रवींद्र पांडुरंग बागूल नंदुरबार, रुपाली संभाजी चव्हाण – नाशिक ग्रामीण, अनिल छबू मोरे, मीना तडवी आणि नीलेश गायकवाड(जळगाव) मुदतवाढ, उमेश बोरसे, दीपक बिरारी, अमोल मोरे, राहुल मोरे (जळगाव) नाशिक ग्रामीण, तुषार देवरे- धुळे, किशोर पवार, संदीप परदेशी, गणेश अहिरे, अमोल पवार आणि हरीश भोये – अहमदनगर, विनोदकुमार गोसावी – नंदुरबार, दिनेश भदाने यांची जळगावी बदली करण्यात आली आहे.
बदली झालेले पोलिस उपनिरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) – गणेश चौभे – नाशिक ग्रामीण, विनोद मधुकर खांडबहाले- अहमदनगर, अमोल किशन गुंजाळ – नंदुरबार, संदीप श्रीराम चेडे – नाशिक ग्रामीण, विजय रामसिंग वसावे – नंदुरबार, अविनाश लक्ष्मण दहिफळे – धुळे, गणेश मुरलीधर मुर्हे- नंदुरबार, माया नारायणसिंग राजपूत (नंदुरबार) जळगाव, राहुल शिवाजी सानप, मनोज जनार्दन महाजन आणि सोपान रमेश गोरे या तिघांची (अहमदनगर) जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.















Discussion about this post