जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात पोलिस चौकीपासून काही अंतरावरच वाहनामध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात नऊ जणांना जीव गमवावा लागला व दोन कुटुंब पूर्णपणे उदध्वस्त झाले. त्यानंतर अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर कारवाईचा धडाका लावण्यात आला होता. या घटनेला तीन महिने उलटत नाही तोच पुन्हा अवैध गॅस सिलिंडरचा साठा आढळून आहे.
रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीमध्ये घर क्रमांक ३५ येथे किरण भागवत पाटील (५१) याने बेकायदेशीर गॅस विक्रीसाठी सिलिंडरचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे गॅस विक्रीच्या उद्देशाने सिलिंडरचा मोठा साठा करून ठेवल्याचे आढळले. त्यात २९ व्यावसायिक, २१ घरगुती भरलेले असे एकूण ५० भरलेले सिलिंडर आढळून आले.
Discussion about this post