जळगाव। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज बहुतांशी जिल्ह्यांना पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिला मिळणार आहे.
उद्या म्हणजेच सोमवारी चौथ्या टप्प्यातील, मतदानादिवशीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभीजनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यादेवी नगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यामधील जळगाव येथे आज ‘पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रात्री जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून तापमानात घट नोंदविली जाणार आहे.
राज्यात कुठे कोणता अलर्ट?
दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड आणि लातूर येथे आज रविवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ आहे. या काळात वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. रविवारी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे ‘यलो अॅलर्ट’ असून बुधवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड येथे बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही अकोला, बुलडाणा येथे रविवारी, अमरावती, नागपूर, वाशिम येथे रविवारी आणि सोमवारी तर वर्धा आणि यवतमाळ येथे सोमवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात सर्वदूर बुधवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ची परिस्थिती कायम राहू शकेल, असे पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले आहे.
Discussion about this post