जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यात मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात 13 वर्षांच्या एका मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात मात्र यश आलं आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते. रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते, एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते.
दरम्यान या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू पलटी केली. यामुळे शेडमध्ये झोपलेल्या पाच जणांचा दबून मृत्यू झाला. गणेश काशिनाथ धनवई (वय ४० रा.गोळेगाव) भूषण गणेश धनवई,(वय १६ रा गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय २० रा. पद्मावती)यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्या मधे समावेश आहे.
Discussion about this post