भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमध्ये १३७६ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या पदांसाठी होणार भरती?
रेल्वेमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डायटिशियन, नर्सिंग सुपरीटेंडेट. ऑडिओलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँढ मलेरिया इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, लॅब सुपरीटेंडंट, कार्डियाक टेक्निशियन, फिल्ड वर्कर या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
रेल्वेमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. १७ ऑगस्ट २०२४ पासून या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १६ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ५०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.
याचसोबत आरआरबी एनटीपीसीमध्येदेखील सध्या भरती सुरु आहे. ११००० हून अधिक जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जप्रक्रिया १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे.
Discussion about this post