रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तब्बल ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.
रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. रेल्वेतील ग्रुप डी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३६ असणे गरजेचे आहे.
रेल्वेत ग्रुप डी भरतीमध्ये इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट लोको शेड, सहाय्यक, पॉइंट्समॅन बी, ट्रॅक मेटेंनर पदांसाठी भरती होणार आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर होणार आहे. यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. त्यांना बेसिक सॅलरी १८००० रुपये असणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्तेदेखील दिले जाणार आहेत.
Discussion about this post