इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने सरकारी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आणि तांत्रिक अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने त्यांच्या पाइपलाइन्स विभागात अप्रेंटिसशिप पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेत विविध राज्यांमधील एकूण ३९४ पदे भरली जातील.
या नोकरीसाठी तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२६ असणार आहे. आसाम, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
भरतीसाठी पात्रता
इंडियन ऑइलमधील ट्रेक्निशियन अप्रेंटिस ट्रेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनियरिंग ऑटोमोबाइल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेट्रॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
असा कराल अर्ज?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम NATS किंवा NAPS पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑइल पाइपलाइन्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज भरावा. सर्व अर्ज माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वे plapps.indianoilpipelines.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.















Discussion about this post