जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल त भारतीय नौदलात चांगली संधी आहे. भारतीय नौदलाने १०+२ (बी. टेक) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमासाठी रिक्त जागांची भरती करणार आहेत. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ६ जानेवारीपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे.
पदाचे नाव : एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
आवश्यक पात्रता :
उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) मध्ये किमान ७०% गुणांसह आणि इंग्रजीमध्ये किमान ५०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण केलेली असावी. पुढे, जेईई मेन-२०२३ परीक्षा (बी.ई./बी.टेक.साठी) बसलेल्या उमेदवारांना जेईई मेन २०२३ च्या ऑल इंडिया कॉमन रँक लिस्टद्वारे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) साठी बोलावले जाईल.
वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
शुल्क : शुल्क नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024
Discussion about this post