सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात अग्निवीर होण्याची संधी आहे. आर्मी अग्निवीर भरती २०२५ साठी ऑनलाइन अर्ज सुरू होत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे. म्हणजे आता फॉर्म भरण्यासाठी फक्त १० दिवसांचा वेळ आहे.
अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आर्मी वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन करता येतो. याअंतर्गत, अग्निवीर जीडी, टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला पोलिस या पदांसाठी सैन्यात भरती केली जाईल. याशिवाय, हवालदार (सर्वेक्षक), हवालदार (शिक्षण), जेसीओ (धार्मिक शिक्षक), जेसीओ (केटरिंग) आणि ऑटोमेटेड कार्टोग्राफर यांसारख्या पदांसाठीही भरती केली जाईल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १७.५ ते २३ वर्षे असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अग्नीवीर () एसएसआर- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅथ्स, फिजिक्ससोबत केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्समध्ये १२वी पास केलेली असावी. अग्निवीर एमआर- या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सुल्क भरु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post