भारतीय तटरक्षक दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाने सेलर जनरल ड्यूटी (जीडी) आणि सेलर डोमेस्टिक ब्रांच (डीबी) साठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ३०० रिक्त जागा भरल्या जातील
या भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरु असून joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ज्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठीची परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.
रिक्त पदांची माहिती
सेलर जनरल ड्यूटी (GD) २६०
सेलर डोमेस्टिक ब्रांच (DB) ४०
आवश्यक पात्रता?
इंडियन कोस्ट गार्ड जनरल ड्यूटी जीडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र/गणित विषयासह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर दहावी उत्तीर्ण उमेदवार सेलर डोमेस्टिक ब्रांच डीबीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार भरतीची अधिकृत सूचना तपासू शकतात.
वयोमर्यादा
या आयसीजी भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे आहे. म्हणजेच, उमेदवारांची जन्मतारीख १ सप्टेंबर २००३ पूर्वीची आणि ३१ ऑगस्ट २००७ नंतरची नसावी.
निवड प्रक्रिया- या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीएफटी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क: अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
भारतीय तटरक्षक दलाच्या या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवारांना आयसीजीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Click Here |















Discussion about this post