भारतीय वायुसेनेत अग्निवीर क्रीडा कोटा मधून भरती सुरू आहे. आय ए एस म्हणजेच इंडियन एअर फोर्स येथे अग्निपथ योजनेच्या अंतर्गत अग्निवीरवायू (क्रीडा) या पदासाठी ही भरती सुरू आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करू शकतात. हा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २९ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे.
इतके वेतन दिले जाईल-
पहिले वर्ष – ३०,०००/- दर महिना
दुसरे वर्ष – ३३,०००/- दर महिना
तिसरे वर्ष – ३६,५००/- दर महिना
चौथे वर्ष – ४०,०००/- दर महिना
चार वर्षानंतर सोडताना – १०.०४ लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज
वयश्रेणी : अग्निपथ योजनेच्या अंतर्गत अग्निवीरवायू (क्रीडा) या पदासाठी सुरू असलेल्या या भरतीत वय वर्ष १७.५ ते २१ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात.
निवड प्रक्रिया :
भारतीय वायुसेनेसाठी सुरू असलेली ही भरती चार टप्प्यांमध्ये पार पडेल. या भरती प्रक्रियेत स्पोर्ट्स ट्रायल, फिजिकल फिटनेस टेस्ट ज्यात उमेदवार हा इंडियन एअर फोर्स ने ठरवून दिलेल्या सर्व आवश्यक मेडिकल स्टॅंडर्ड मध्ये बसत आहे याची तपासणी केली जाईल. उमेदवारांच्या सर्व डॉक्युमेंट्स चे व्हेरिफिकेशन एका फेरीमध्ये केले जाईल. तसेच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी देखील पार पडेल. या चार टप्प्यांमधून निवडून आलेल्या पात्र उमेदवारांची त्या त्या पदावर नेमणूक केली जाईल.
अर्ज शुल्क : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १००/- अर्ज शुल्क भरावे लागेल.
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल. आणि अर्ज भरण्यासाठी दिनांक २९ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख असेल. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या वेळेत त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास उमेदवाराचा अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही आणि उमेदवाराला या भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल.
https://agnipathvayu.cdac.in/casbspm/candidate/login या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या लिंक वर क्लिक करून तेथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या भरतीत सहभागी होण्याकरिता पात्रतेचे निकष देखील ठरवून देण्यात आले आहेत. https://agnipathvayu.cdac.in/AV/eligibilityCriteria या लिंक वर त्या सर्व पात्रतेच्या निकषांसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल.















Discussion about this post