जळगावात संविधान सन्मान संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जळगाव । जगाच्या इतिहासात भारतीय संविधान अलौकिक प्राप्त आणि ऐतिहासिक मूल्यांचा, सांस्कृतिक मूल्यांचा आणि एकूणच मानवी जीवन मूल्यांचा भरमसाठ खजिना असून, आत्मसन्मानाच्या लढाईसाठी संविधान प्रत्येक नागरिकाला बळ देत असते नव्हे तर प्रत्येक स्त्री-पुरुषाला आत्मसन्मान प्राप्त करून देत असते असे विचार युवा नेते धनंजय चौधरी यांनी व्यक्त केले.
चोपडा मार्केट कांताई सभागृहाशेजारी, जळगांव येथे संविधान सन्मान संमेलनाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.राजेश झाल्टे होते विचार मंचावर प्राचार्य एस. एस. राणे, सुरेंद्र पाटील जयसिंग वाघ मान्यवर उपस्थित होते.
संयोजक मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करताना संविधान संमेलन आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत संविधान हा भारतीय नागरिकाचा खरा दागिना असल्याचे स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी संविधान मूल्यांची जपणूक आणि जोपासना करण्यासाठी भारतीय नागरिकांनी सजग राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. होते.प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रीतीलाल पवार यांनी मानले.
याप्रसंगी डॉ.बापू शिरसाठ, विनोद रंधे, जगदीश सपकाळे, चेतन नन्नावरे, प्रीतम कुमार तायडे, महेंद्र केदार, विजयकुमार मौर्य, अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, हरिचंद्र सोनवणे,प्रा. किसन हिरोळे, एडवोकेट आनंद कोचुरे, संतोष गायकवाड साहेबराव बागुल यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले.
यावेळी सुरेश पाटील, पितांबर अहिरे, दत्तू सोनवणे,नंदन पाटील, ज्योती भालेराव, सोपान चौधरी,मनोहर गाढे, मनोहर कोचुरे, गोपाळ भालेराव, डी.एम.भालेराव, भैय्या सपकाळे, मिलिंद देशमुख, आकाश सपकाळे, भरत सोनवणे,अजय सपकाळे,समाधान सोनवणे, सुश्मिता भालेराव,अजय पाटील, विनोद अढायंगे, डी.एच. निकुंभ, गोकुळ पोहेकर अशोक सपकाळे, रमेश सोनवणे, दीपमाला सुरवाडे, भारती रंधे, ललित महिरे, सोमा भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.















Discussion about this post