पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
इम्रानचा पक्ष पीटीआयने दावा केला आहे की, इम्रान खानला यांना जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर इम्रानची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील ५ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रानविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापू शकते.
जिओ न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जमान पार्क रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोणत्याही मेळाव्यास परवानगी नाही. आंदोलकांना अटक केली जाईल.
याआधी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान यांनी तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील ‘जाणूनबुजून लपवल्याचा’ आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर ट्रायल कोर्टाने निकाल दिला.
Discussion about this post