Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!
पालकमंत्री यांच्या हस्ते महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन-२०२६ उद्घाटन
जळगाव | जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्या वतीने आयोजित शासनामार्फत केंद्र सरकारच्या “जिल्हा जळगाव हे निर्यात केंद्र” (District as Export Hub) या कार्यशाळेचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, उद्योग संचालक श्रीमती वृषाली सोनी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्ह्यालाऔद्योगिक क्षेत्रामध्ये आता डी प्लस क्षेत्राचा दर्जा मिळाला असल्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग आले येतील राज्याच्या औद्योगिक धोरणामुळे जळगावला एक चांगली संधी मिळाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, हा दर्जा जिल्ह्याला मिळण्यासाठी सर्व उद्योजक आमच्या सोबत होते, उद्योजकांना जी मदत लागत होती ती आम्ही केली डी प्लस दर्जा मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भरपूर मदत केली.
औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, येणाऱ्या काळात छोटे छोटे नवीन उद्योग या ठिकाणी घ्यावेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. जिल्ह्यातील केळी उद्योगाला चालना मिळावी यासाठी  अंगणवाड्यांच्या पोषण आहारात केळीचा समावेश करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दर तीन महिन्यांनी उद्योजक व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावण्यात यावी, अशी सूचना त्यांनी संबंधित विभागाला केली. आज या कार्यक्रमात, उद्योजकांनी सन्मानपत्र देऊन माझा जो सन्मान केला आहे ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
खासदार स्मिता वाघ आपल्या मनोगतात म्हणाल्या, उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन उद्योग पुढे जाऊ शकत नाही, जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग येणे गरजेचे तर आहेच परंतु छोटे उद्योग सुद्धा जीवंत राहिले पाहिजे त्यांच्या अडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जळगावमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जळगाव विमानतळाला कार्गो सुरू झाले पाहिजे, विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
आमदार सुरेश भोळे यावेळी म्हणाले, जळगाव शहरातील उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे आवश्यक आहे तसेच विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, जळगाव औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अद्यावत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तसेच जिल्ह्यात विविध उद्योग आणण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रशासनातर्फे सुद्धा  प्रयत्न सुरू आहेत, बेरोजगार युवकांना नोकरी, नवीन व्यवसायाबाबत माहिती व्हावी यासाठी आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयात एक माहिती कक्ष सुरू करत आहोत. या केंद्रामार्फत प्रशिक्षित युवकांना नोकरीची संधी कुठे कुठे उपलब्ध असेल,व्यवसाय करणाऱ्या युवकांसाठी नवीन व्यवसाय बाबतची माहिती या केंद्रमार्फत दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात उद्योग सहसंचालक श्रीमती सोनी म्हणाल्या, औद्योगिक उत्पादनाच्या निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे तसेच निर्यातवाढीसाठी जिल्ह्यांना अधिक सक्षम व उत्तरदायी बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या  “जिल्हा जळगाव हे निर्यात केंद्र” (District as Export Hub) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सुरुवातीला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत बँकेने मंजूर केलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत तीन स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत एक अशा चार मालवाहू ई-रिक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा..!
Previous Post

ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास…

Next Post

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जळगाव जिल्हा परिषदेच्या आणखी ६ कर्मचारी निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जळगाव जिल्हा परिषदेच्या आणखी ६ कर्मचारी निलंबित

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page