जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात किंवा फायनान्समध्ये आपले करिअर करायचे असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे. IDBI बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
या पदांसाठी होणार भरती
IDBI बँकेत ३ पदांसाठी भरती सुरु आहे. उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ३ जागा रिक्त आहेत तर सहायक महाव्यवस्थापक पदासाठी १५ जागा रिक्त आहे. व्यवस्थापक पदांसाठी १३ जागा रिक्त आहेत.त्यामुळे तुम्ही या जागांसाठी अर्ज करु शकतात.
२५ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
उपमहाव्यवस्थापक पदासाठी १, ९०,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे तर सहायक महाव्यवस्थापक पदासाठी १,५७,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे. तर व्यवस्थापक पदासाठी १,१९,००० वेतन दिले जाणार आहे. याबाबत सर्व माहिती https://www.idbibank.in/ या वेबसाइटवर दिली आहे. यासाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
याचसोबत तुम्ही आयबीपीएस अंतर्गत होणाऱ्या बँकेच्या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. आयबीपीएस लिपिक पदांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत लेखी स्वरुपात परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ११ सरकारी बँकासाठी असते. जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तर तुम्हाला सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळेल.















Discussion about this post