सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर झाली असून या याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ३६२ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे १५-२० दिवस आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आवश्यक पात्रता
या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५५० रुपये फी द्यावी लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
अर्जप्रक्रिया
इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना mha.gov.in वर जायचे आहे.
यानंतर संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
यानंतर सर्वात आधी रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
यानंतर तुम्ही वेबसाइटवर लॉग इन करा. वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर फॉर्म भरायचा आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post