जळगाव । गेल्या चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. अधून मधून विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्यामुळे काही पिकांची नासाडीही झाली आहे. पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीमध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस व केळी पिकाचे झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसेच सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये कापसाला फुले लागून कापूस बाहेर येण्याची वेळ असते. मात्र, अतिपावसामुळे फुले गळून पडू लागली आहेत. काही ठिकाणी कापसाची बोंडे काळी पडली आहेत, केळीचेही नुकसान झाले आहे.
Discussion about this post