मुंबई । सध्या राज्यासह देशात दुहेरी हवामान स्थिती अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यातच हवामान विभागाने (IMD) अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भरउन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही जेऊरमध्ये झाली आहे, जेऊरमध्ये 44. 5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. हवामान विभागाकडून बीड, जळगाव, वर्धा, अकोला, नांदेड अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.















Discussion about this post