मुंबई । जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल किंवा या बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.एचडीएफसी बँक ग्राहकांना किती व्याजदर देत आहे जाणून घेऊया.
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदराचा लाभ मिळणार आहे. बँक एफडीवर ७. ७५ टक्के व्याजदराचा लाभ ग्राहकांना देत आहे. यामध्ये बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीची सुविधा देतेय. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ देते आहे. बँकेने एफडी दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. बँकेने याबाबतची माहिती अधिकृत साइटवर शेअर केली आहे.
बँक कसे देते व्याजदर
बँक ग्राहकांना ८ महिन्यांपासून ते २० महिन्यांपर्यंत सर्वाधिक व्याजदर देते आहे. सामान्य गुंतवणुकदरांना एफडीवर ७.२५ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ दिला जाईल.
जर ग्राहकांनी ५ वर्ष, १ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीची एफडी केली तर त्याला ७.७५ टक्के व्याज मिळेल. यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ हा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. तर सामान्य गुंतवणुकदारांना ७ टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल. ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर ३.५ टक्के ते ७.७५ टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. १८ महिने ते २१ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीला ७ ते ७.२५ टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.















Discussion about this post