देशातील विविध बँकामध्ये कर्मचारी भरती केली जात आहे. यातच आता एचडीएफसी बँकेत भरतीची जाहिरात निघालीय. एचडीएफसी बँकेने रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. तुम्ही आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
एचडीएफसी बँकेतील पीओ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी फॉर्म प्रिंट करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.
पदाचे नाव : या भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता : एचडीएफसी बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे १-१० वर्षांचा सेल्समध्ये अनुभव असावा. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.
रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५५ असावी. एचडीएफसी बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांना ३,००,००० ते १२,००,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही आयबीपीएसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
Discussion about this post