जळगाव : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये”, असं संजय राऊत म्हणाले होते. आता या टिकेवरून शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
“संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला हवा”, अशा कडक शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची आज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा देखील होऊ लागली आहे.
भाजप नेते आशिष देशमुख म्हणत आहेत तशीच परिस्थिती या देशामध्ये आहे. या देशात भगवा झेंडा घेऊन चालेल त्यांचेच राज्य येणार आहे. जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. “काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग लागेल”, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. या वक्तव्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे
‘गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही’
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असं चॅलेंज भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. याच विषयावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांचा राजकीय अंदाज खरा ठरो. माझ्या हाताने ते पेढा खावोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.















Discussion about this post