मुंबई । राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता सरकारच्या हालचालींना वेग आला असून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
आज मंगळवारी संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकी घेतली जाणार आहे. त्यानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे ४० दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
सरकारने पुढील दहा दिवसांत राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
CM एकनाथ शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.















Discussion about this post