मुंबई । शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्याचा शासन निर्णय २० सप्टेंबरला काढण्यात आला होता. मात्र २४ तासाच्या आत हा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातूनच हा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्णयात काही बदल करायचे होते आणि शुद्धीपत्रक काढायचे होते पण मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री गणेशोत्सवात व्यस्त असल्याने थेट निर्णय रद्द करण्यात आला आहे.तर या अभियानाचे नियंत्रण महिला व बालविकास विभागाचे सचिव करणार होते. अभियानाचे प्रमुख महिला व बालविकास विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी जिल्ह्याचे अभियान प्रमुख होते. आता यात बदल केला जाणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिल्याने शासन निर्णय गुरुवारी रद्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे हे विशेष अभियान आहे, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अभियानाचे प्रमुख असणे योग्य राहील. कारण जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांना तसे निर्देश देणे सोईचे होईल. त्याशिवाय अभियानाला गतीही मिळणार नाही. हा बदल करायचा असल्याने शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.
Discussion about this post