मुंबई । आजपासून नवीन वर्ष २०२५ सुरु झाले आहे. दरम्यान गेल्या वर्षात सोने आणि चांदी दराने ऐतिहासिक पातळी गाठली असून सोने-चांदीच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. या नवीन वर्षात दोन्ही धातूंच्या किमतीतून दिलासा मिळणार का? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किंमतीमध्ये ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोने-चांदीच्या किंमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. जाणून घ्या सोने-चांदीच्या किंमती.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती ()
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१५० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,२०० रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ७१,५०० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६२,४०० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ७८,००० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत ४४० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या किंमती
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. आज ८ ग्रॅम चांदी ७२४ रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,०५० रुपये आहे.
Discussion about this post