जळगाव : गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर लोक सोने-चांदीची दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र सोन्याचा दर थेट ७१ हजारांपेक्षा जास्त वाढला आहेस. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीही ८२ हजारावर गेली आहे. दोन्ही दरात झालेल्या दरवाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
एक तोळे सोने तब्बल 71 हजारांवर
जळगावच्या सोने बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ७१५०० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा हा दर थेट ७३,६०० वर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.
चांदीचे दरही गगनाला भिडले
देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णपेठेत चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. आज चांदीचा भाव ८२००० रुपये प्रतिकिलो झाला आहे. गेल्या दहा दिवसांत चांदीच्या भावात प्रतिकीलो 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चांदीचे भाव वाढल्याने ग्राह चांदी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं दिसतंय.















Discussion about this post