जळगाव । दोन दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात पुन्हा वाढ होत असून सोने भाव ७९ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. तीन दिवसांपूर्वी घसरण झालेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन ती ९१ हजार ६०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात थोडाफार चढ-उतार सुरू होता. त्यानंतर मंगळवारी चांदीत एक हजार ८०० रुपयांची घसरण झाली. मात्र, सोने भावात केवळ ३०० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर बुधवारी सोने याच भावावर स्थिर राहून गुरुवारी त्यात एक हजार २०० रुपयांची, तर शुक्रवारी पुन्हा १०० रुपये अशी दोन दिवसांत एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७९ हजार ८०० रुपयांवर पोहोचले.
यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सोने ८० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर मात्र हे भाव कमी झाले होते. आता अडीच महिन्यांनंतर सोने पुन्हा एकदा ८० हजारांच्या दिशेकडे जात आहे. अमेरिकेने बदलेल्या आर्थिक धोरणामुळे ही भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे बुधवारपासून चांदीच्याही भावात पुन्हा वाढ होत जाऊन ती शुक्रवारी (१७ जानेवारी) ९१ हजार ६०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे
Discussion about this post