मुंबई/ जळगाव । आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या किमतीने प्रचंड उसळी घेतली आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने ही पातळी ओलांडली आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतीनेही वेगाने वाढ होऊन नवीन विक्रम प्रस्थापित केले.
चांदीचे भाव काही केल्या थांबत नाही
चांदीचे दर थांबताना दिसत नाहीत. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) उघडताना, चांदीच्या किमती १३,५५३ रुपयांनी वाढल्या आणि पहिल्यांदाच ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. १ किलो चांदीचा नवीन सार्वकालिक उच्चांक ३,०१,३१५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी, MCX चांदीचा दर २,८७,७६२ रुपये प्रति किलोवर बंद झाला.तर ३१ डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या दिवशी १ किलो चांदीची किंमत ₹२,३५,७०१ होती, जी आता ₹३,०१,३१५ प्रति किलोवर पोहोचली आहे.
सोने अचानक ₹२,९०० ने महाग
आता सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, MCX सोन्याचा दर चांदीसारखाच वाढत आहे. गेल्या आठवड्यात, शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी, सोन्याचा वायदा भाव ₹१,४२,५१७ प्रति १० ग्रॅमवर बंद झाला आणि सोमवारच्या सुरुवातीपर्यंत तो ₹१,४५,५०० च्या नवीन उच्चांकावर पोहोचला होता. याचा हिशोब करता, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात २,९८३ रुपयांची वाढ झाली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता, ३१ डिसेंबर २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३५,८०४ रुपये होती, म्हणजेच ती प्रति १० ग्रॅम ९,६९६ रुपयांनी वाढली आहे.















Discussion about this post