जळगाव । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी आणि मंगळवारी झालेली पडझड आज थांबली आहे. आज बुधवारी सोन्यापाठोपाठ चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातुमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरवाढीचे इनकमिंग सुरूच असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. जळगावच्या सराफा बाजारात आजक बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचे भाव 1 हजार 545 रुपयाने वाढले तर चांदी 4 हजार 120 रुपयाने महाग झाली.
आज सोन्याचा दर 1 लाख 26 हजार 690 रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव जीएसटीसह एक लाख 62 हजार 740 रुपये आहे. दिवाळीनंतर दोन्ही धातुत स्वस्ताई आली होती. पण आता भाव पुन्हा वधारले आहेत.















Discussion about this post