मुंबई । सोने आणि चांदी दरात सुरु असलेली चढ उतार कायम असून मागच्या काही दिवसात दोन्ही धातूंत मोठी वाढ झालीय. यातच आता आज बुधवारी सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. सोन्याच्या भावाने नव्या विक्रमाला गवसणी घातली. हौसमोजेसाठी ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
MCX, वायदे बाजारात सोन्याच्या किंमती 94,573 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहचल्या. त्यानंतर किंमत नरमली. गुरुवारी सकाळी जवळपास 9:40 वाजता किंमती 13 टक्के तेजीसह 94,475 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होत्या. सकाळी किंमती 1300 रुपयांनी महागली.बुधवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार उसळी दिसून आली.
डॉलर सातत्याने घसरत असल्याने सोन्याच्या किंमती एकदम उसळल्या. तर जागतिक बाजारात अमेरिकन धोरणामुळे ट्रेड वॉर सुरू आहे. त्याचा हा परिणाम असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहे. वाढत्या किंमतींमुळे ग्राहक मात्र नाराज झाले आहेत. ऐन लग्नाच्या हंगामात झालेली दरवाढ अनेकांची चिंता वाढवणारी आहे.
सोन्याची किंमत वाढण्याची कारणं काय?
भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी किरकोळ महागाईत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे व्याजदरात अजून कपातीची आशा बळावली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारीत किरकोळ महागाई दर मार्च 2025 मध्ये कमी होऊन 3.34 टक्क्यांवर आला आहे. हा दर ऑगस्ट 2019 नंतर सर्वात कमी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा दर 3.61 टक्के इतका होता. गेल्या मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 4.85 टक्के नोंदवण्यात आला होता.
Discussion about this post