मुंबई : एकीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु असून यातच सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसून आला आहे. सोन्याच्या दराची वाटचाल 1 लाख रुपयांच्या दिशेनं सुरु झाली आहे.
दंर्यान, आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 899 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 85744 रुपये आहे. चांदीच्या दरात देखील 1437 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचे दर 95626 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सोने आणि चांदीचे दर जीएसटीशिवायचे असून त्यामध्ये जीएसटीची रक्कम मिळवल्यास 1 ते 2 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
नववर्षात सोनं 10 हजार रुपयांनी महागलं आहे. तर, चांदीच्या दरात 9609 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला सोनं 75740 रुपये होतं. तर, जीएसटी आणि इतर करांसह सोन्याची किंमत 79 हजार रुपयांच्या दरम्यान होती. चांदीचे दर 31 डिसेबर 86017 रुपये होता. सर्राफा बाजारात सोन्याच्या दरानं 89500 रुपयांपर्यंत मजल मारली होती. म्हणजेच, दीड महिन्यात सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी वाढला आहे.
आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 23 कॅरेट सोन्याच्या दरात 876 रुपयांची वाढ होऊन 85401 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 824 रुपयांची वाढ झाली असून सोनं 78542 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 674 रुपयांनी वाढून 64308 रुपयांवर पोहोचला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 50160 रुपयांवर पोहोचला आहे.
Discussion about this post