जळगाव । सोने दरात सातत्याने चढ उतार सुरु असून सोमवारी साडेतीन हजार रुपयांनी घसरलेल्या सोने दराने मंगळवारी उसळी घेतली. जीएसटीसह सोमवारी ९६६१४ रुपयांवर असलेले सोने दुसऱ्या दिवशी १०३० रुपयांनी वाढून ९७६४४ रुपयांवर पोहचले आहे. दरम्यान, ही दरवाढ बाजारपेठेतील नियमित असून येत्या दोन आठवड्यात सोने पुन्हा पूर्वपदावर येण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
सोन्याच्या दरात तेजी असताना चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी साडेतीन हजार रुपयांची घसरण झाली होते. दुसऱ्याच दिवशी सोने एक हजाराने वाढले आहे. अशी ही दरवाढ आगामी काळातही चालूच राहणार असल्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.
दरम्यान, सोमवारी साडेतीन हजारांची घसरण व मंगळवारी एक हजाराची वाढ बाजारपेठेतील नियमित चढ-उतार आहेत. त्यामागे विशेष कारण नाही. उर्वरित आठवठ्यात तेजीची स्थिती राहिल. तर दोन आठवड्यात तीन हजाराने खाली आलेले सोने पुन्हा पूर्वपदावर जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक यांनी वर्तवला आहे.
Discussion about this post