मुंबई । नवरात्रोत्सव सुरु असून दसरा सण मोजक्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याच्या मूहूर्तावर सोने खरेदी करणे, चांगले असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करतात. मात्र, त्यापूर्वीच सराफ बाजारात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे. सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. सणासुदीच्या काळात तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा दर काय आहे.
शनिवारी (27 सप्टेंबर 2025) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 11,48,800 रुपयांवरुन 11,54,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 1,14,880 रुपयांवरुन 1,15,480 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 10,53,000 रुपयांवरुन 10,58,500 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 1,05,300 रुपयांवरुन 1,05,850 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
18 कॅरेट सोन्याच्या दरात 4500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 8,61,600 रुपयांवरुन 8,66,100 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 86,160 रुपयांवरुन 86,610 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
आजचा चांदीचा दर किती?
सोन्याच्या दरात वाढ झालेली असताना चांदीच्या दरात सुद्धा तेजी दिसून येत आहे. या तेजीमुळे चांदीचा दर 1,49,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.















Discussion about this post