जळगाव । शहरातील विठ्ठलपेठ परिसरात अकरावीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७) असे मृत मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्यामागचं कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील विठ्ठलपेठ परिसरात आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्यास असलेली ट्विंकल ही का.ऊखाजी कोल्हे येथे अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, आई वडील कामानिमित्त बाहेर असलयाने दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती.
दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते. याचा फायदा घेत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्विंकल हिच्या आत्महत्यांमागील कारण अद्यापही समोर आले नाही तिच्या पश्चात वडील सुरेश चौधरी, आई अर्चना, लहान भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे.















Discussion about this post