नांदेड । मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र सुरूच असून अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेडच्या जवळच असलेल्या सोमेश्वर गावातील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे विद्यार्थीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी कोमलने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तिने लिहिले की, ‘मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझे बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई-अण्णा मला माफ करा’.