नाशिक । नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राज्यभरातून विरोध होत असतानाच नाशिक महापालिकेने चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी तब्बल 1270 झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
अंजली दमानिया यांनी आपल्या वक्तव्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र टीका करताना गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केले. राज्यभरातून विरोध होत असूनही, नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की लोकांनी आंदोलन केलं, तरी काही फरक पडत नाही, असे दमानिया यांनी कठोर शब्दात म्हटले.
त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीनं वागणाऱ्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेका, अशी हाक दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे. नाशिकच्या नागरिकांमध्येही या प्रकरणाबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.















Discussion about this post