जळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून अशातच आता जळगावच्या तरुणीला ठगांनी लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पार्ट टाईमचा जॉब देण्याचे सांगून तरुणीची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरात वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय तरुणीला १९ ऑक्टोबर रोजीपासून व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणाऱ्या अनोळखी दोघांनी तरुणीशी संपर्क साधला. यानंतर त्या तरुणीला पार्टटाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले. याकरिता फ्लाइट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.
सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित आणि निधी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.















Discussion about this post