मुंबई । बहुचर्चित नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्याचा निकाल लागला असून या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा होती. अखेर नियमानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
याबाबत पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निर्णय घेतला असून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. एकीकडे आगामी निवडणूकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
२००२ साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणाचा आता तब्बल २२ वर्षांनी निकाल लागला. ज्यामध्ये जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले होते. सुनील केदार यांच्यासह ६ जणांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर ३ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.















Discussion about this post