सातारा । साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं. हॉटेलमध्ये गळफास घेऊन डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. दरम्यान, महिलेनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
डॉ. संपदा मुंडे असं महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. मुंडे या फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू होती.
डॉ. मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, ‘माझ्य़ावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन’, अशी तक्रारही दाखल केली होती. तक्रार दाखल करूनही कारवाई झालेली नव्हती. याच मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. डॉ. मुंडे यांनी हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास सुरू आहे.















Discussion about this post