जळगाव : हिंदूस्थान युनिलिव्हरसह अन्य नामांकीत कंपन्यांकडून उत्पादीत होणार्या वरील ब्रॅण्डच्या उत्पादंनासारखीच बनावट उत्पादने तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सात लाखांचा बनावट मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नामांकीत कंपन्यांच्या उत्पादनाप्रमाणे हुबेहुब दिसणार्या बनावट उत्पादनाच्या साठ्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध दोन ठिकाणी छापा टाकत एकूण सात लाख पाच हजार 745 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोरेगाव मुंबई येथील नेत्रिका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे फिल्ड ऑफीसर सिध्देश सुभाष शिर्के यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहडी रोडसह गायत्री नगरात छापेमारी
जळगाव शहरातील शिरसोली नाका, मोहाडी रोड, नेहरु नगर येथील जयप्रकाश नारायणदास दारा याच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनात तीन लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात इनो सिक्सर, झंडू बाम, आयोडेक्स, हार्पीक पॉवर प्लसच्या बाटल्या, डेटॉल साबन, डव शँपुचे पाऊच, सर्फ एक्सलचे पाऊच आदी बनावट माल जप्त करण्यात आला तर गायत्री नगर येथील आकाश राजकुमार बालानी यांच्याकडे देखील बनावट मुद्देमाल मिळून आला. दोन्ही ठिकाणी सात लाख पाच हजार 745 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आदींच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, पोना. योगेश बारी, सचिन पाटील, पोका. विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, राजश्री बावीस्कर आदींच्या पथकाने केली.
जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, पो.ना. योगेश बारी, सचिन पाटील, विशाल कोळी, राहूल रगडे, छगन तायडे, महिला पोकॉ राजश्री बाविस्कर यांनी कारवाई केली.
Discussion about this post