पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता असून सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय, असा दावा प्रकाश आंबेडकर
यांनी केला आहे. तसंच 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
तसंच देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना (OBC) टार्गेट केलं जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केलं त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे. ओबीसींनी सतर्क राहा.
2024 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नााहीत : आंबेडकर
आंबेडकर म्हणाले, महात्मा फुले यांनी जो लढा सुरू त्याची फळे आपण चाखत आहे. सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषदने हे म्हटले नसले तरी फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं संविधान बदलणार नाही. जोपर्यंत आर आर एस चे प्रमुख मोहन भागवत आहे असे वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नाही. 2024 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नााहीत.















Discussion about this post