मुंबई । सिनेसृष्टीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आलाय. मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेता दिलीप शंकर यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ते तिरुअनंतपुरममधील वनरोज जंक्शन परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते.
दिलीप शंकर यांच्या मृत्यूमुळे मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या वृत्ताने चाहते व त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. काही मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमधील एका स्टाफने सर्वप्रथम अभिनेत्याचा मृतदेह बघितला. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून पुढील तपास केला जातोय.
मल्याळम अभिनेत्याचा मृतदेह आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंचाग्नी’ नामक टीव्ही शोच्या चित्रिकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून दिलीप शंकर हे वनरोज जंक्शन परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. अशात त्यांचा थेट मृतदेह आढळल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला?, की त्यांच्यासोबत घातपात झाला?, याबाबत आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.















Discussion about this post