सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीने अचानक प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीचं घर गाठलं.त्याने घरात घुसून राडा घातला. त्यांनतर धमकी दिली.इतकंच नाही, तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.हा प्रकार यवतमाळ वणी पोलीस ठाणे परिसरात घडली.
याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहे. पतीसोबत पटत नसल्याने तक्रारदार महिला ६ वर्षांपासून विभक्त राहते. यादरम्यान, महिलेचे चिखलगाव येथील एका व्यक्तीसोबत (वय ४०) प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही सातत्याने एकमेकांना भेटत होते. मात्र, अलिकडे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने प्रेयसी प्रियकराला टाळू लागली.
प्रियकराकडून सातत्याने येणाऱ्या कॉलला महिला त्रस्त झाली होती. अखेर तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. ही बाब लक्षात येताच प्रियकर संतापला. त्याने रविवारी रात्री प्रेयसीचे घर गाठले. तू माझा नंबर का ब्लॉक केला, असं म्हणत त्याने मध्यरात्री घरात राडा घातला.
इतकंच नाही, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.















Discussion about this post