मुंबई : विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ईलेक्ट्रीक वाहने करमुक्त करण्याची घोषणा केली. पर्यावरणाच्या संदर्भात शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यानी उत्तर दिले. तसेच, राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही ईलेक्ट्रिक असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन शासनातर्फे ईव्ही म्हणजेच ईलेक्ट्रिकल व्हेईकल्सला (EV) प्राधान्य दिले जात आहेत. नागरिकांनी अधिकाधिक ईव्ही खरेदी करावी यासाठी ईलेक्ट्रीक वाहनांवर सबशिडीही देण्यात येत आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यानी ईलेक्ट्रीक वाहने करमुक्त करण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण इलेक्ट्रिक व्हेईकल बाबत आधी टॅक्स लावला नाही. 30 लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नाही, त्यावर 6 टक्के कर लावतोय. इलेक्ट्रिक वाहनांवरील तो टॅक्स मागे घेण्यात येईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत ईलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री करण्याचे सूतोवाच केले. तसेच, शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
मर्सिडीज घ्यायची, फडणवीसांचा टोला
शासकीय कार्यालयासाठी शक्य असेल त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जातील, आमदारांना गाड्यांसाठी दिले जाणारे कर्ज केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. त्यावर, आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. तर, शासकीय योजना गरजूंसाठी आहे, लोभींसाठी नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लगावला.















Discussion about this post