जळगाव । येथील समस्त पुष्टी मार्गीय गुजराती वैष्णव समाज संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच सत्यवल्लभ हॉलमध्ये पार पडली. यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात येऊन पदभार हस्तांतरण करण्यात आले.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष -चंद्रहास गुजराती (जळगाव) उपाध्यक्ष- नयन सराफ (धरणगाव) सचिव मितेश पोतदार (चोपडा) सहसचिव- मिलन मेहता (जळगाव) कोषाध्यक्ष- विक्रांत सराफ (जळगाव) सहकोषाध्यक्ष- नैलेश देसाई (जळगाव) मीडिया संपर्कप्रमुख- प्रा.राजेंद्र खडायते (जळगाव) यांच्यासह 14 जणांचा सदस्य म्हणून कार्यकारणी समावेश करण्यात आला आहे.
सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतीश लाड यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर.बी. गुजराती, प्रा. श्याम शहा, प्रशांत गुजराती, सचिन गुजराती, हिंमत सेठ, आनंद गुजराती, राम हुंडीवाले यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post