एनफोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एनफोर्समेंट डायरेक्टरेटच्या अधिकृत वेबसाइटवर enforcementdirectorate.gov.in जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ()
ईडीमध्ये ७ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. सिस्टीम अॅनालिस्टसाठी १ जागा रिक्त आहे. सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. एकूण ७ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (ED Recruitment 2025)
सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी ७०,००० रुपये पगार मिळणार आहे. सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट ५५,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरुन ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जावर तुम्हाला सिस्टीम अॅनालिस्ट किंवा सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट असं लिहायचं आहे. तुम्ही अर्ज उप निदेशक (प्रशासन), अतिरिक्त निदेशक कार्यालय, कोलकत्ता झोनल ऑफिसर १, सीजीओ कॉम्प्लेक्स, एमएसओ बिल्डिंग, सहावा मजला, डिएफ ब्लॉक, साल्ट लेक, कोलकत्ता येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post