अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे असून केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते. या भरती प्रक्रियेतून तब्बल 62 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये.
या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.
ही पदे भरली जाणार
ज्युनियर पर्चेस असिस्टंट (JPA) 17
ज्युनियर स्टोअर कीपर (JSK) 45
पात्रता:
ज्युनियर पर्चेस असिस्टंट: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ज्युनियर स्टोअर कीपर : 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा जास्त आणि 27 पर्यंत असावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.















Discussion about this post